बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 28 जुलै . राज्यातील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा – खरीप हंगाम 2026 आयोजित केली आहे. यंदा प्रथमच या स्पर्धेसाठी स्वतंत्र ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी ही स्पर्धा ऑफलाइन पद्धतीने होत होती. मात्र, पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.
स्पर्धेत कोणत्या पिकांचा समावेश?
- भात
- ज्वारी
- बाजरी
- मका
- नाचणी (रागी)
- तूर
- मूग
- उडीद
- सोयाबीन
- भुईमूग
- सूर्यफूल
या 11 पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
पात्रता
- जमीन शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर असावी.
- जमीन स्वतः कसत असणे आवश्यक.
- एका शेतकऱ्याला एका पिकासाठीच सहभाग.
- भातासाठी किमान 20 गुंठे, इतर पिकांसाठी 40 गुंठे सलग क्षेत्र आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
- Farmer ID
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश
प्रवेश शुल्क
- सर्वसाधारण प्रवर्ग – ₹300
- अनुसूचित जमाती प्रवर्ग – ₹150
अर्जाची अंतिम मुदत
- मूग व उडीद : 31 जुलै 2026
- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल : 31 ऑगस्ट 2026
बक्षिसे
तालुका स्तर
- प्रथम – ₹5,000
- द्वितीय – ₹3,000
- तृतीय – ₹2,000
जिल्हा स्तर
- प्रथम – ₹10,000
- द्वितीय – ₹7,000
- तृतीय – ₹5,000
राज्य स्तर
- प्रथम – ₹50,000
- द्वितीय – ₹40,000
- तृतीय – ₹30,000
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील “पीक स्पर्धा” लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करावा किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.









