शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील अग्रसेन चौक येथे भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या ऑटोने टाटा नेक्सॉन कारला धडक दिल्याची घटना रविवारी दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारच्या समोरील बंपरचे सुमारे ₹30 हजारांचे नुकसान झाले. यानंतर कारचालकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल प्रकाश अहीर (वय 43, व्यवसाय – सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, रा. पहूरजिरा, पोस्ट जळंब, ह.मु. सुताळा खुर्द, ता. खामगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद रियाजुद्दीन फुरकान देशमुख (वय 25, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 324(4), 352 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने एमएच-28 टी-2078 क्रमांकाचा ऑटो भरधाव व निष्काळजीपणे चालवून फिर्यादी यांच्या एमएच-28 बीडब्ल्यू-9496 क्रमांकाच्या टाटा नेक्सॉन कारला धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील बंपरचे अंदाजे ₹30 हजारांचे नुकसान झाले. तसेच आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








