---Advertisement---

मतदार यादी SIR 2026: BLO घरी येणार; पडताळणीची संधी दवडू नका!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने (ECI) मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी Special Intensive Revision (SIR) – 2026 मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत Booth Level Officer (BLO) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. त्यामुळे BLO भेट देईल तेव्हा त्यांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.

SIR म्हणजे काय?

SIR (Special Intensive Revision) म्हणजे मतदार यादीतील डुप्लिकेट, मृत, स्थलांतरित मतदारांची नावे पडताळून आवश्यक दुरुस्ती करणे आणि पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करण्याची विशेष मोहीम.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे वेळापत्रक

  • 20 ते 29 जून 2026: BLO प्रशिक्षण
  • 30 जून ते 29 जुलै 2026: घराघरांत पडताळणी
  • 5 ऑगस्ट 2026: मसुदा (Draft) मतदार यादी प्रसिद्ध
  • 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026: दावा व हरकती स्वीकारल्या जातील
  • 7 ऑक्टोबर 2026: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

कोणाला काय करावे लागेल?

  • 2002–2004 च्या SIR मतदार यादीत नाव मॅप झाले असल्यास: साधारणपणे अतिरिक्त कागदपत्रांची गरज नसते.
  • नाव नसल्यास किंवा तपशील बदलायचा असल्यास: निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कागदपत्रांनुसार अर्ज करावा.
  • ऑनलाइन अर्ज: नागरिक अधिकृत पोर्टलवरूनही Enumeration Form भरू शकतात.

लक्षात ठेवा

  • BLO भेट देईल तेव्हा शक्यतो उपलब्ध राहा.
  • नाव, पत्ता किंवा इतर तपशील तपासून घ्या.
  • कोणतीही शंका असल्यास आपल्या BLO, ERO कार्यालयाशी संपर्क साधा किंवा अधिकृत पोर्टलचा वापर करा.

अधिक माहितीसाठी व ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी:
ECI Voter Portal

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment