---Advertisement---

Shegaon Crime News: शेगावात आदित्य गेस्ट हाऊस परिसरातून ₹20 हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव |(डी ललित) : शेगाव शहरातील आदित्य गेस्ट हाऊस परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी करून नेल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वासुदेव सहदेव बोरसे (वय 50, व्यवसाय शेती, रा. देगाव, ता. बाळापूर, जि. बुलढाणा) यांची काळ्या रंगाची व निळे पट्टे असलेली स्प्लेंडर प्लस दुचाकी आदित्य गेस्ट हाऊस येथे उभी होती.

दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरी गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.चोरीस गेलेल्या वाहनाचा क्रमांक MH 30 X 4275 असून, त्याचा चेसीस क्रमांक MBLHA10EE9HK33499 आणि इंजिन क्रमांक HA10EA9HK33220 असा आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 303(2) BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ गजानन वाघमारे, करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment