---Advertisement---

शेगावात वरली-मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात वरली-मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 710 रुपये रोख, वरली-मटका अंक लिहिलेली चिठ्ठी आणि एक डॉट पेन असा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजारातील अंडा सेंटरसमोर ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता गजानन राजू तायडे (वय 41, रा. धनगर नगर, शेगाव) याच्याकडे वरली-मटका जुगाराशी संबंधित साहित्य व रोख रक्कम आढळून आली.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष शंकर गवई यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम अप. नं. 512/2026, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया 11 ऑगस्ट रोजी रात्री 7.39 वाजता करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment