---Advertisement---

लाडनापूर येथे अहिल्यादेवी पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार!

---Advertisement---

लाडनापूर | (आकाश बोरसे) : लाडनापूर येथे १३ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यादेवी पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरराव खाडपे होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ. गणेशजी दातीर, विश्वासराव पाटील (खरेदी-विक्री संघ अध्यक्ष, संग्रामपूर), सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीपजी काळे साहेब, संजय बोरसे व योगेशजी पुंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत सावजी महाराज यांच्या पूजनाने तसेच अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी लाडनापूर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गावातील प्रथम MBBS विद्यार्थी निलेदातीर, तसेच प्रिया चावरे, मयुरी बोदळे, श्रुती चिकटे, नाना बोदळे यांच्यासह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष प्रकाश साबे, अंबादास गव्हाळे, गणेशजी वहीत्कार, सुनील भिवटे, गोपालभाऊ फंड, नितीन साबे, सोपान साबे, भास्कर इलामे, रामा घायल, श्रीकृष्ण घायल, यश वहीत्कार, तंटामुक्ती समितीचे श्रीकृष्ण उमाळे, गोपालभाऊ कावरे, पंढरपूर उगले, ‘अनाथांचे नाथ’ मुरलीधर जामोदे, रामदास घनोट, गणेश सोनोने, सरपंच अनिता गणेश बावस्कार, माजी सरपंच पुरुषोत्तम बोदळे, सदस्य मनीताई सोनोने यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोषराव चिकटे, संदीप अघडते, विठ्ठल अघडते, राजूभाऊ बोदळे, रामदासजी अघडते, शालिकराम बोदळे, रामभाऊ बोदळे, विशाल बोदळे, प्रमोद रायपुरे, मुरलीधर वसत्कार आदींसह मित्रमंडळाने परिश्रम घेतले.

या कार्यक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासोबतच सामाजिक कार्य करणाऱ्या महिला व कार्यकर्त्यांचा सन्मान करून समाजात सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment