शेगाव : (डी ललित) : शहरातील मिल्लत नगर परिसरातून अॅपे रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद अताउर रहेमान अब्दुल कययुम (वय 42, रा. मिल्लत नगर, शेगाव) यांची काळा-पिवळ्या रंगाची अॅपे रिक्षा क्रमांक MH 28 BA 0868 चोरीस गेली. सदर रिक्षाची अंदाजे किंमत 1 लाख 30 हजार रुपये आहे.
ही घटना 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8.30 वाजेपासून 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मिल्लत नगर, शेगाव येथे घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रिक्षा चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.58 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल अधिकारी म्हणून पोहेका रवी इंगले यांनी कार्यवाही केली असून, तपास पोहेका वाकेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या अॅपे रिक्षाचा शोध घेण्यासाठी शेगाव शहर पोलीस तपास करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








