---Advertisement---

जिल्हा युवा पुरस्काराने सुरज बोरसे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान!

---Advertisement---

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेत शेगाव येथील मेरा युवा भारतचे माजी स्वयंसेवक तथा नेहरू युवा मंडळ, भोनगावचे अध्यक्ष सुरज मार्तंडराव बोरसे यांना सन २०२४-२५ चा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांच्या हस्ते सुरज बोरसे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, पोलीस अधीक्षक निवृत्ती तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्याची दखल

असंघटित युवकांना संघटित करणे, युवक व नागरिकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी योगदान देण्याच्या कार्याची दखल घेत सुरज बोरसे यांची जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सुरज बोरसे यांनी यापूर्वीही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. नेहरू युवा केंद्राच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

तसेच ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एस. रामामूर्ती यांच्या हस्तेही त्यांना गौरविण्यात आले होते.

यापूर्वीच्या सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत मिळालेल्या जिल्हा युवा पुरस्कारामुळे सुरज बोरसे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment