---Advertisement---

Shegaon Crime: शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; 255 रुपयांचा मुद्देमाल जप्त!

---Advertisement---

शेगाव I (डी ललित) : शाळेच्या परिसरापासून 100 मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा मौलाना उर्दू हायस्कूलच्या परिसराच्या 100 मीटरच्या आत एक इसम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आला. पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत नगिन तंबाखूच्या 5 पुड्या, रवाल तंबाखूच्या 10 पुड्या, गाय छाप तंबाखूच्या 5 पुड्या, 30 उंट बिडीचे 5 बंडल आणि A 10s कंपनीच्या सिगारेटची 2 पाकिटे असा एकूण 255 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शकील अहेमद हाजीशेख महेमुद (वय 52, रा. डगडाळीपुरा, शेगाव) यांच्याविरुद्ध सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य, उत्पादन व वितरण नियमन) कायदा 2003 अर्थात COTPA Act-2003 अंतर्गत कलम 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन शंकर डाबेराव यांनी फिर्याद दिली.सदर घटनेचा पुढील तपास माननीय पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात ग्रे. पो. उ. नि. गजानन गावंडे हे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment