शेगाव I (डी ललित) : शेगाव शहरातील धनगरपुरा परिसरात 24 वर्षीय युवकाने राहत्या घरावरील सौरप्लांटच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश अनिल बारसे (वय 24, रा. धनगरपुरा, नागझरी रोड, शेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तो मजुरीचे काम करीत होता. अज्ञात कारणावरून त्याने राहत्या घरावरील सौरप्लांटच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिसांनी कलम 194 BNSS अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताचे काका प्रकाश रामकृष्ण बारसे यांनी याबाबत तोंडी माहिती दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास PSI गजानन गावंडे करीत आहेत.(युवा क्रांती वृत्तसेवा)








