---Advertisement---

Shegaon Crime News : शेगावातील आनंद विहार परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेल्या तरुणावर कारवाई!!

---Advertisement---

शेगाव : (डी ललित ) : शहरात मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना आनंद विहार परिसरात एका पान सेंटरच्या शटरजवळ अंधारात संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेला तरुण आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केली.

पवन श्रीराम शेगोकार (वय ३०, रा. मिलिंद नगर, शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी आनंद विहार परिसरातील जय गजानन पान सेंटरच्या शटरजवळ एक व्यक्ती सरकारी वाहनाच्या प्रकाशात अंधारात दबा धरून बसलेली पोलिसांना दिसून आली.

सदर व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले. अंधारात बसण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे सदर व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवून चोरीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आला. या प्रकरणी पोहेका सुरेंद्रसिंग चव्हाण यांनी दिलेल्या लेखी अहवालावरून कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका निलेश गाडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रकरणाची नोंद दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री १.५० वाजता करण्यात आली.

दाखल अधिकारी : पोहेका इस्तियाक शेख, शेगाव शहर पोलीस ठाणे
तपास अधिकारी : पोहेका निलेश गाडगे,
घटनास्थळ : आनंद विहार परिसर, शेगाव
घटनेची वेळ : २५ ऑगस्ट २०२६, रात्री १२.३० वाजता (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment