शेगाव |(डी ललित) : शेगाव शहर पोलिसांनी म्हाडा कॉलनी परिसरात कारवाई करत १७ नग देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका ४३ वर्षीय व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान म्हाडा कॉलनी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह कारवाई केली. यावेळी आरोपी लाला कान्हैय्यालाल काचवा (वय ४३, रा. विकली मार्केट रोड, श्री टॉकीजजवळ, रा. शेगाव; सध्या व्यंकटेश नगर, शेगाव) याच्या ताब्यातून देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या १७ सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ६८० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी विनोद वाघमारे यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील सुसर करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








