---Advertisement---

Shegaon News : शेगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 23 जणांवर गुन्हा, 1.36 लाखांचा मुद्देमाल जप्त!!

---Advertisement---

शेगाव (डी ललित) : शेगाव शहरातील श्रीनिवास टॉवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या चमुतील पोलिसांनी छापा टाकून 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, 16 स्मार्टफोन, एक जुना मोबाईल आणि पत्त्यांचे संच असा एकूण 1 लाख 36 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 10 सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली असून गुन्ह्याची नोंद 11 सप्टेंबर रोजी पहाटे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास टॉवर येथील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरोपींच्या ताब्यातून 55 हजार 80 रुपये रोख, प्रत्येकी 5 हजार रुपये किमतीचे 16 स्मार्टफोन, एक जुना वापरता मोबाईल तसेच 52 पत्त्यांचे संच असा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक न. सुनिल राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 574/2026, कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बारिंगे यांचे पथक करीत आहे.

पोलिसांनी या कारवाईत युनुस खान फतेह खान (वय 46), उस्मान बेग मुघल बेग (39), शेख इकबाल शेख दिलदार (49), मोहम्मद जाफर मोहम्मद हनीब (44), राजेश सुदामराव भांड (56), मोहम्मद अस्लाम मोहम्मद मुसा (45), इमरान खान सलीम खान (28), शेख अस्लाम अब्दुल सलाम (39), शंकर शालीगाम अळसाळकर (60), संतोष देवराव चौधरी (50), मोहम्मद जमील मोहम्मद शरीफ (48), राहत खान सुजात खान (47), मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम (30), शेख रईस शेख अनवर (40), सय्यद मुनीर सय्यद बिलाल, राजेश हिरालाल गंगावले (55), गणेश तुळशीराम गवळी (58), मोहम्मद शोएब मोहम्मद युसुफ (20), शेख सईद शेख नथ्थू कुरेशी (41), शेख जावीद शेख इब्राहिम (38), शेख चाऊंद शेख गुलामनबी (35), अक्रम खान रहीम खान (35) आणि शेख रशीद शेख गणी (42) यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींना सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारिंगे करीत आहेत. या कारवाईमुळे शेगाव शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment