---Advertisement---

Shegaon News : शेगाव येथे १४ व १५ सप्टेंबर रोजी श्री गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा; भव्य महाप्रसादाचे आयोजन!!

---Advertisement---

शेगाव, (युवा क्रांती वृत्तसेवा ) : ऋषीपंचमी आणि श्री गजानन महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री गजानन सेवा समिती (शेगाव-नागपूर-अकोट) यांच्या वतीने शेगाव येथे १४ व १५ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय धार्मिक व सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, शेगावसह परिसरातील हजारो भाविक या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेणार आहेत.

“खिरापत घालिता वैष्णव मुखी, तेणे देव होतसे सुखी” या संतवचनाचा आदर्श समोर ठेवून श्री गजानन सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. भक्तांची सेवा, समाधान आणि अध्यात्मिक वातावरण निर्मिती या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सोमवार, १४ सप्टेंबर आणि मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी रेल्वे स्टेशन रोडवरील अग्रसेन भवन, शेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. महाप्रसादासोबत हरिनामाचा जयघोष करण्यात येणार असून, दोन दिवस सकाळी काकड व भजन, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री विठ्ठल नामजपाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीहरीचे भजन होणार असून, दुपारी १२ वाजता श्रींची आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

या मंगल सोहळ्यात भाविकांनी तन-मन-धनाने सहभागी होऊन श्री गजानन महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करावी तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन श्री गजानन सेवा समिती (शेगाव-नागपूर-अकोट) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दोन दिवस हरिनामाचा जयघोष

श्री गजानन महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १४ व १५ सप्टेंबर रोजी दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकड व भजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री विठ्ठल नामजप होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११ ते १२ वाजता श्रीहरीचे भजन आणि दुपारी १२ वाजता श्रींची आरती होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांसह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment