---Advertisement---

Shegaon : शेगावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू!!

---Advertisement---

शेगाव (डी ललित) : शहरातील जुने सेंट्रल बँक चौक परिसरात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवा बाळकृष्ण ढोके (वय ३४, रा. मुडगाव, ता. अकोट, जि. अकोला) हे जुने सेंट्रल बँक चौक परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करीत असताना इंडियन आरसीज बँकेसमोर एक पुरुष उलथा पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सदर व्यक्तीमध्ये कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यानंतर हात लावून पाहिले असता श्वासोच्छवास बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर शेगाव शहर पोलिस ठाण्यात कलम १९४ BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारणही समजू शकलेले नाही.

प्रकरणाची प्राथमिक चौकशी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करुटले यांच्याकडे सोपविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्रकरण दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण यांनी केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment