---Advertisement---

MTSE परीक्षेत सेंट झेवियर्सच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; रिद्धी घुले, आदित्य गवई जिल्ह्यात प्रथम!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (MTSE) २०२५-२६ मध्ये सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूल, शेगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेच्या जिल्हास्तरीय गुणवत्तायादीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी अव्वल कामगिरी केली असून, इयत्ता दहावीची विद्यार्थिनी रिद्धी घुले हिने तर इयत्ता नववीतील आदित्य गवई याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशामुळे सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी भारसाकळे, झुबिया खान, भक्ती सोंटक्के, अनुष्का राठोड, कृष्णाली हेलोडे, तेजल हागे, रिद्धी घुले, वैष्णवी भिसे, नवनीत कुकडे, आदित्य गवई, मोहम्मद मुकर्रम, अथर्व ठाकरे, रुद्र देशमुख, श्री काठणे, पार्थ उनहाळे, सौरभ जेठे आणि श्रीजित हांटोडे यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन, मेहनत तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. मार्गदर्शक, मेंटर व समन्वयक सय्यद आफाक सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल सिस्टर अँजेलिन यांच्या हस्ते सय्यद आफाक सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य फादर बेंजामिन यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची ही कामगिरी अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या यशामुळे शाळेच्या लौकिकात भर पडल्याचे त्यांनी नमूद केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शेगाव परिसरातील पालक, नागरिक आणि शैक्षणिक वर्तुळातून सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तसेच शाळा प्रशासनाचे कौतुक होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment