---Advertisement---

Shegaon : दारू का प्यायलीस? असे विचारताच पत्नीच्या डोक्यात दगड मारला; शेगावात पतीविरुद्ध गुन्हा!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शहरातील विश्वनाथ नगर परिसरात दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सुनीता मधुकर देशमुख (वय ४०) या मजुरी करून घरी परतल्या असता त्यांचे पती मधुकर देशमुख (वय ४५) यांनी त्यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी ते दारूच्या नशेत असल्याने पत्नीने दारू का प्यायली? अशी विचारणा केली. यावरून आरोपीने पत्नीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर फिर्यादी घराबाहेर गेल्या असता आरोपीही त्यांच्या मागे बाहेर आला. घरासमोरील जमिनीवर पडलेला दगड हातात घेऊन त्याने पत्नीच्या डोक्याच्या मध्यभागी मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

याप्रकरणी सुनीता देशमुख यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलिस ठाण्यात कलम ११८(१), ३५२ BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली असून, सायंकाळी ५.४० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोहेका विनायक सरोदे यांनी केली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास पोहेका सुनिल सुसर करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment