शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील वरवट रोडवरील गौरव ढाब्यासमोरील शेतातून ५ हॉर्सपॉवरची मोटार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दौलतपुरा, शेगाव येथील शेतकरी आकार हरीभाऊ धनोकार (वय ५४) हे २३ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या शेतात गेले असता त्यांना विहिरीच्या काठावर पाइपचे तुकडे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता तेथे ठेवलेली ५ HPची मोटार दिसून आली नाही
शेतकऱ्याने परिसरात तसेच इतर ठिकाणी मोटारचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. अखेर अज्ञात चोरट्याने मोटार चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या मोटारीची किंमत १२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोहेका विनायक सरोदे यांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास पोहेका सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








