जळगाव जामोद, (आकाश बोरसे ) : दि. 11 जून – जळगाव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जळगाव जामोद वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या बैठकीत सन 2026-27 या आगामी कार्यकालासाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ विधीज्ञ अँड. रूपेश पी. विश्वेकर यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी अँड. एस. व्ही. खुपसे आणि सचिवपदी अँड. अभिमन्यू बी. वाघ यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ विधीज्ञ अँड. माहेश्वरी यांनी भूषविले. व्यासपीठावर ज्येष्ठ विधीज्ञ अँड. खिरोडकर आणि अँड. जी. एस. गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अँड. रवी उंबरकर, अँड. मुकुंदा टोंगलकर आणि अँड. विनोद मुंडोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडीच्या ठरावासाठी अँड. आर. एस. काकडे यांनी अनुमोदक म्हणून तर अँड. डी. बी. इंगळे यांनी सूचक म्हणून काम पाहिले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यावेळी ज्येष्ठ वकिलांनी स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. बैठकीस जळगाव जामोद न्यायालयातील सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. रूपेश विश्वेकर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत, वकील संघाच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच बार असोसिएशन अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात वकील संघाची कार्यकारिणी संघटनेच्या बळकटीकरणासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. (युवा क्रांती वृत्तसेवा)








