---Advertisement---

निवडणूक ब्रेकिंग!! जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी

“महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी मतदान प्रक्रिया”
---Advertisement---

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी घेतली जाणार आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषदांअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम यापूर्वी १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, छाननी, माघार, चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक होते.

दरम्यान, राज्यात जाहीर करण्यात आलेल्या दुखवटा कालावधीचा विचार करता निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी २०२६ रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील.

⏰ सुधारित निवडणूक वेळापत्रक

  • मतदान: ७ फेब्रुवारी २०२६
    सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
  • प्रचार समाप्ती: ५ फेब्रुवारी २०२६, रात्री १० वाजता
  • मतमोजणी: ९ फेब्रुवारी २०२६
    सकाळी १० वाजल्यापासून
  • राजपत्र प्रसिद्धी: ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत
  • निकाल जाहीर होताच संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेला थोडा विलंब झाला असला तरी उर्वरित सर्व टप्पे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment