मतदार पडताळणी मोहिमेत ग्रामस्थांचा मोठा सहभाग; आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण!
पळशी झाशी | (आकाश बोरसे) : १७ जुलै-ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या वतीने शासनाच्या SIR (मतदार ओळखपत्र पडताळणी) विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कॅम्पमध्ये सुमारे ५०० ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. अर्जदारांकडून आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्ज व्यवस्थित भरून घेण्यात आले.
यावेळी नागरिकांना शासनाच्या SIR मोहिमेबाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदार नोंदणी, पडताळणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे, BLO कल्पना स. चितोडे (केंद्र क्र. 115), मंगला तु. करांगळे (केंद्र क्र. 116), एस.एच. शिरसोले (केंद्र क्र. 117) तसेच सहाय्यक BLO ज्योती म. आमले आणि पूजा अ. मारोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा विशेष कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला. (युवा क्रांती वृत्तसेवा)









