---Advertisement---

शेगावातील ज्योतिष्यप्रज्ञ पी. आर. लंके महाराज यांचे निधन!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास असलेले प्रख्यात ज्योतिष्यप्रज्ञ पी. आर. लंके महाराज यांचे दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिचित, आप्तेष्ट व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेल्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

पी. आर. लंके महाराज हे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे व्यक्ती म्हणून परिचित होते. ते नागरिकांना भविष्याबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच जन्मटिपण तयार करणे, कुंडलीविषयक मार्गदर्शन तसेच विविध धार्मिक विधी व पूजाअर्चा याबाबत मार्गदर्शन करीत असत. नागरिकांच्या घरातील विविध धार्मिक व कौटुंबिक समारंभांमध्येही ते पूजा-अर्चेचे मार्गदर्शन करीत होते.

आपल्या साध्या व आपुलकीच्या वागणुकीमुळे तसेच धार्मिक व ज्योतिषविषयक मार्गदर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकजण त्यांना प्रेमाने ‘महाराज’ या संबोधनाने हाक मारत असत.

पी. आर. लंके महाराज यांच्या निधनाने शेगावातील परिचित व नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment