---Advertisement---

तेल्हारा तालुक्यात भीषण अपघात; मोटरसायकल-ट्रॅक्टर धडकेत एक ठार, एक जखमी!!

---Advertisement---

तेल्हारा(आकाश बोरसे) : तालुक्यातील वाडी अदमपूर ते जाफरापूर-दहीगाव मार्गावर आज दुर्दैवी अपघात घडला. मोटरसायकल आणि माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅक्टर माती घेऊन जात असताना हा अपघात घडला. मोटरसायकलवरील दोघे जण इवाई पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. याचदरम्यान ट्रॅक्टरसोबत त्यांची धडक झाली.

या अपघातात पातुर्डा येथील हरिभाऊ पुंडे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कालखेड येथील गुरव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत व्यक्तीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment