---Advertisement---

रेल्वेखाली एका व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरूच!

---Advertisement---

शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा ): शेगांव रेल्वे स्थानकाजवळील नागझरी शिवारात नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना सन 2024 मध्ये घडली होती. या घटनेची माहिती ट्रकमॅन उमेश सागर भातपुते यांनी घटनास्थळ पाहताच स्थानक प्रबंधकांना देत लेखी स्वरूपात नोंदविली होती. त्यानंतर ही बाब शेगांव पोलिसांना कळविल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू झाली.

घटनेच्या तपासाची जबाबदारी PSI कुणाल जाधव यांनी सांभाळली होती. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. प्राथमिक तपासात हा रेल्वे अपघात असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्षे होते. आणि त्याच्या मानेवर इंग्रजीत DUKNA असे काढलेले होते. रेल्वेची धडक इतकी भीषण होती की त्याचे दोन्ही हात-पाय तुटलेले होते आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या. मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत असल्याने ओळख पटविण्याचे काम अधिक कठीण झाले होते.

मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही त्या वेळी मृत व्यक्तीची ओळख पटवणे शक्य झाले नव्हते. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेणे, हरविलेल्या व्यक्तींची नोंद तपासणे अशा सर्व दिशा तपासूनही पोलिसांना कोणताही ठोस सुगावा लागला नव्हता.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी सांगितले की, २०२४ पासून आजतागायत या व्यक्तीबाबत कोणताही ठोस सुगावा मिळालेला नाही. त्यामुळे या अनोळखी व्यक्तीबाबत कुणाकडे काही माहिती असेल, त्याला ओळखत असतील किंवा त्याच्या ओळखीचा कोणताही धागा मिळू शकतो असे वाटत असल्यास तात्काळ संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक :
📞 शेगांव पोलीस स्टेशन – 07265 252010
📞 PSI कुणाल जाधव – 99222 74709

पोलीस प्रशासनाने नागरिकांकडून सहकार्याची विनंती करत, एक अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या कुटुंबापर्यंत माहिती पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment