शेगांव (आकाश बोरसे) : मुंबईतील विधानभवन येथे आज विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. विविध पक्षांच्या आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेत विधिमंडळातील नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात केली.
शपथ घेतलेल्या आमदारांची नावे
- (शिंदे गट) बच्चू कडू
- (ठाकरे गट) अंबादास दानवे
- (BJP) प्रज्ञाताई राजीव सातव
- (BJP) माधवी नाईक
- (BJP) विवेक कोल्हे
- (BJP) संजय भेंडे
- (BJP) प्रमोद जठार
- (BJP) सुनील कर्जतकर
- (शिंदे गट) डॉ. नीलम गोरे
- (पवार गट – दादा) झीशान सिद्दीकी
आज पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यामुळे विधान परिषदेतील राजकीय वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)








