जळगाव जामोद (आकाश बोरसे): महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती प्रक्रियेत भेंडवळ बु. येथील पुनम बाळकृष्ण साबे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची नागपूर येथील अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग अंतर्गत रसायनशास्त्र (Chemistry) विषयाच्या उच्च माध्यमिक शिक्षक (Higher Secondary Teacher) पदावर निवड झाली आहे.
पवित्र पोर्टलच्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत पुनम साबे यांनी उत्तम गुण मिळवत ही निवड मिळवली. जिद्द, सातत्य आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे.
त्यांच्या या यशाबद्दल प्रफुल लोणाग्रे, नितीन साबे, यशवंत पाचपोर, सुनील नेमाडे, पार्थ पिलांत्रे, अतुल लोणाग्रे यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवाराने आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.
पुनम साबे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)









