---Advertisement---

शेगाव तालुक्यात वृद्धावर मारहाण; शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) :शेगाव तालुक्यातील आडसुळ गावात किरकोळ कारणावरून 80 वर्षीय वृद्धाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांत 14 मे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3) नुसार आरोपी अजय मोहन सरदार (वय अंदाजे 35, रा. आडसुळ ता. शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी झाबाजी सावजी सिरसाट (वय 80) हे 12 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोरील ओट्यावर बसले असताना आरोपी तेथे आला. कोणतेही कारण नसताना आरोपीने शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीने जाब विचारल्यानंतर आरोपीने त्यांच्या गालावर चापट मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जवळ पडलेला विटेचा तुकडा उचलून फिर्यादीच्या छातीवर फेकून मारल्याने त्यांना दुखापत झाली.

यावेळी आरोपीने “पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला तर तुम्हाला पाहून घेईल” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपो धनराज माने करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment