शेगाव,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ३० मे-राजमाता लोकमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त शेगाव येथील धनगर नगर परिसरात भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कांचनताई शेळके यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ३० मे रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती, धनगर नगर, शेगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, समाजातील सर्व बांधवांनी उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कीर्तन सोहळा हनुमान मंदिर, धनगर नगर, शेगाव येथे संपन्न होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.









