---Advertisement---

आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !!

---Advertisement---

मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) : By Team DGIPR दि. १३ एप्रिल २०२६-भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वर्गीय आशा भोसले यांनी संगीत क्षेत्राशी संबंधित एक संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिला होता. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेला साकार करण्यासाठी शासन पुढाकार घेईल आणि त्यासाठी आवश्यक ती सकारात्मक पावले उचलली जातील.

बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखविला. संपूर्ण मंत्रिमंडळाने दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ घडवणाऱ्या आशा भोसले यांनी हजारो गाणी गाऊन संगीतविश्वाला समृद्ध केले. त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले असून, त्यांचे योगदान अविस्मरणीय मानले जाते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment