---Advertisement---

आषाढी एकादशी २०२६: पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या; १ जुलैपासून आरक्षण सुरू!

---Advertisement---

पंढरपूर यात्रेसाठी मध्य रेल्वेची विशेष सुविधा; १ जुलैपासून बुकिंगला सुरुवात

मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण १ जुलै २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या विशेष गाड्या चालविण्यात येत असून, आरक्षण सर्व संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

विशेष रेल्वे गाड्यांचा तपशील

  • 🚆 नागपूर – मिरज विशेष : ४ फेऱ्या
  • 🚆 नवी अमरावती – पंढरपूर विशेष : ४ फेऱ्या
  • 🚆 खामगाव – पंढरपूर विशेष : ४ फेऱ्या

रेल्वे प्रशासनाने भाविकांना प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन केले असून, विशेष गाड्यांचा लाभ घेऊन गर्दी टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment