पिंप्री काथरगाव (आकाश बोरसे) : पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या वतीने अति उष्णतेमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विमा तसेच महाराष्ट्र रोजगार हमी फळबाग योजनेचे मस्टर त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा कृषी अधिकारी मार्फत तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
तसेच ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना अद्यापही पैसे मिळाले नसल्याने महिला व बालविकास अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. राहिलेल्या महिलांना तात्काळ निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.

यावेळी केळी उत्पादक शेतकरी, रामचंद्र भाऊ, संदीप खराटे, मुंडे नागेश खराटे, योगेश खराटे, सोपान खराटे, विठ्ठल खराटे, दत्तात्रय गाळकर, परमाळे काका, प्रमोद भाऊ गडे, मुन्नाभाऊ राऊत, अनंत भाऊ शेजोळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश भाऊ टापरे तसेच गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. ‘लाडक्या बहिणी’ योजनेबाबत निवेदन देताना तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी व राहिलेल्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेचे पैसे त्वरित वितरित करावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांनी दिला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)









