---Advertisement---

8 जून रोजी बुलढाण्यात डाक अदालत; पोस्ट सेवांबाबतच्या तक्रारींचे होणार निवारण!!

---Advertisement---

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलढाणा दि. 25 मे 2026 पोस्ट विभागाच्या विविध सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बुलढाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 8 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. सहा आठवड्यांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे.

पोस्ट सेवा ही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असून, नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी पोस्ट खाते सातत्याने प्रयत्नशील असते. मात्र, पत्रव्यवहार, संभाषण किंवा विविध सेवांमध्ये निर्माण होणाऱ्या त्रुटींमुळे काही वेळा नागरिकांच्या तक्रारी निर्माण होतात. अशा तक्रारींचे योग्य पद्धतीने निवारण करण्यासाठी डाक अदालत आयोजित केली जाते.

या अदालतमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, बचत बँक तसेच मनीऑर्डर संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारी करताना सर्व तपशील, संबंधित तारीख तसेच ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविण्यात आली त्याचे नाव व पद नमूद करणे आवश्यक आहे.

तक्रारी दोन प्रतींमध्ये डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे, बुलढाणा विभाग यांच्या नावे शुक्रवार, दि. 5 जून 2026 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment