---Advertisement---

लोकसेवा हक्क दिनी बुलढाण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव; चिखली तहसील अव्वल!!

---Advertisement---

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 28 एप्रिल–महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 28 एप्रिल हा ‘लोकसेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने नागरिकांना शासकीय सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते उपविभागीय कार्यालय बुलढाणा, खामगाव व सिंदखेड राजा तसेच चिखली, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर तहसील कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जात, उत्पन्न, रहिवासी, शेतकरी दाखले, भूमी अभिलेखविषयक कागदपत्रे तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत व मुदतीपूर्वी देण्यात आल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, राजेंद्र पोळ, अजिंक्य घाडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री ठाकरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ. रामेश्वर पुरी, शरद पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चिखली तहसील कार्यालयाचा विशेष सन्मान

चिखली तहसील कार्यालयाने नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील नागरिकांना तब्बल 98.27 टक्के सेवा वेळेत पुरविण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, हे यश मिळविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही काम करून सेवा वेळेत दिल्या. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ व समर्पित कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते नायब तहसीलदार हरी ज्ञानदेव वीर आणि महसूल सहाय्यक हरिदास थोलबरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये तहसील कार्यालयामार्फत 65 हजारांहून अधिक दाखले वितरित करण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार विजय सवडे यांच्या नेतृत्वाखाली हे यश साध्य झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment