---Advertisement---

बुलढाणा जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे आदेश जारी; तामगाव ठाणेदार पंडितराव सोनवणे यांची डीवायएसपीपदी पदोन्नतीसह बदली!!

---Advertisement---

बुलढाणा, दि. 25 जून (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून, तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांची पदोन्नती होऊन पोलीस उपअधीक्षक (DySP) पदावर नाशिक येथे बदली करण्यात आली आहे.

तसेच सपोनि राजेंद्र पवार यांची शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे यांची जळगाव जामोद, तर विलास बोपटे यांची मलकापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, रिक्त पदांच्या अनुषंगाने पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वासाडे यांची तामगाव पोलीस स्टेशन येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक राजू मोरे (पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा), गजानन शिंदे (शेगाव ग्रामीण) आणि नारायण सरकटे (जळगाव जामोद) यांचीही तामगाव पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.

या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन पदस्थापनेबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment