---Advertisement---

20 मे रोजी केमिस्ट बंद; ऑनलाइन औषध विक्रीविरोधात निवेदन सादर!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : All India Organisation of Chemists and Druggists (AIOCD) तर्फे 20 मे 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी केमिस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर निवेदन सादर करण्यात आले आहे.

ऑनलाइन औषध विक्री बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिले जाणारे अत्याधिक डिस्काउंट थांबवावे तसेच बनावट औषधांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

या संदर्भात अजिंक्य ठाकरे, श्याम पडोळे, प्रदीप माळी आणि अफरोज खान यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून केमिस्ट बंदला पाठिंबा दर्शविला आहे .

संघटनांनी सरकारकडे GSR 817 आणि GSR 220 नियम मागे घेण्याची मागणीही केली आहे. बनावट औषधांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

20 मे रोजी होणाऱ्या या बंदमुळे अनेक मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक औषधांची पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment