---Advertisement---

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस!!

---Advertisement---

बुलढाणा (शीतल निकम ) : आज दि. 20 एप्रिल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देत गाजीपुर अपघातातील जखमी रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील इतर रुग्णांशीही संवाद साधत उपचार व्यवस्थेची माहिती घेतली.

मोताळा तालुक्यातील भाविक देवदर्शनासाठी जात असताना 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपुर (नंदगज) येथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले होते. गाजीपुर येथे प्राथमिक उपचारानंतर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हा दौऱ्यावर असताना प्रतापराव जाधव यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या अपघातग्रस्त निर्मलाबाई पाखरे व भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. याशिवाय वार्ड क्रमांक 2 मधील इतर रुग्णांशी संवाद साधत उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते.

दरम्यान, रोहीणखेड येथील अपघातात मृत्यू झालेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच गावातील जखमी भानुदास हुंबड व नलिनी हुंबड यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment