---Advertisement---

शेतकरी कुटुंबातील सुपुत्राची भारतीय सैन्यातील 17 वर्षांची गौरवशाली सेवा पूर्ण!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.३ जून- स्वामी समर्थ नगर, शेगाव येथील रहिवासी तथा मच्छिन्द्रखेड येथील सुपुत्र गोविंदा शिवाजी भारंबे यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल 17 वर्षे देशसेवा बजावत 31 मे रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गोविंदा भारंबे यांनी अवघ्या 19 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचा वसा हाती घेतला. सैन्यात दाखल होण्यापूर्वी त्यांनी काही काळ श्री गजानन महाराज संस्थान येथे सेवेकरी म्हणूनही कार्य केले होते. त्यानंतर देशसेवेची प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश केला आणि आपल्या कर्तव्यनिष्ठेने विविध ठिकाणी सेवा बजावली.

आपल्या 17 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी जम्मू, पठाणकोट, बिकानेर, सागर, इलाहाबाद आणि गुवाहाटी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत राहून देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान दिले. कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त स्वामी समर्थ नगर वासी, कुटुंबीय, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन देशसेवेचे सर्वोच्च कर्तव्य पार पाडणाऱ्या गोविंदा भारंबे यांचा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सदर कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ नगरातील सर्व नागरिक व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment