अहमदाबाद | (युवा क्रांती वृत्तसेवा) : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत गुजरात आणि मध्य प्रदेशातून प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) शी कथित संबंध असल्याचा संशय असलेल्या आठ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी कारवायांचा कट उधळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
ATS च्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी देशातील विविध भागांत दहशतवादी जाळे उभारण्याच्या आणि कारवायांचे नियोजन करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे :
- अहमद अब्दुल्ला गाजीवाला
- इब्राहिम मोहम्मद हुसेन घाघा
- मुदस्सिर अब्दुल्ला गाजीवाला
- जकारिया दुरानी मोहम्मद अम्मार घाघा
- मुफ्ती फौजान इस्माइल दौवा
- मोहम्मद अमीन शेरा
- मोहम्मद अब्दुल रहमान सावदी
- बिलाल दुरानी मोहम्मद अम्मार घाघा
तपास यंत्रणांनी आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमागील संपूर्ण कट, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य नेटवर्कचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
टीप : अटक करण्यात आलेले सर्वजण आरोपी आहेत. न्यायालयात आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी मानले जाऊ शकत नाही.









