वरवट बकाल | (आकाश बोरसे): जय महाराष्ट्र च्या घोषणांनी परिसर दुमदुमला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणी, झुंजार नेतृत्व व पक्ष प्रवक्ता आदरणीय जयश्रीताई सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शिवसैनिक व युवासैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख विजय मारोडे, मनोज दादा वाघ, वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद भाऊ अस्वार, युवासेना विधानसभा संघटक अजय घिवे, युवासेना तालुका प्रमुख प्रशांत इंगळे, युवासैनिक अभिषेक राजनकर, सोहम मारोडे, चक्रधर घिवे, वैभव घिवे, जय मेटांगे, श्याम भाऊ वाघ (आरोग्य मित्र), डायलिसिस टेक्निशियन प्रवीण हागे आदी शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(युवा क्रांती वृत्तसेवा)









