बुलढाणा |(युवा क्रांती वृत्तसेवा) : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाह स्मृतींना यंदा तब्बल ३७० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि करवंड महोत्सव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल २०२६ रोजी चिखली तालुक्यातील करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत अनुभव नागरिकांना मिळणार असून, आमदार श्वेताताई महाले पाटील व महोत्सव समितीने यासाठी जोरदार तयारी केली आहे.
🎉 महोत्सवाची आकर्षक रूपरेषा
🐎 सकाळी ऐतिहासिक सुरुवात
महोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ ते १० या वेळेत भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. या मिरवणुकीत लेझीम पथक, बँड, अश्वदल, पालखी तसेच ऐतिहासिक वेशभूषेतील मावळ्यांचा उत्साही सहभाग असेल.
⚔️ शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण
लाठी, तलवारबाजी, दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक युद्धकलेचे प्रात्यक्षिके तसेच आगीच्या चित्तथरारक प्रयोगांनी उपस्थितांना रोमांचित केले जाणार आहे.
🎤 दुपारचे शाहिरी आणि व्याख्यान सत्र
- शिवशाहीर प्रवीणजी फणसे (मुंबई) यांचा पोवाडा कार्यक्रम (१२ ते १.३०)
- प्रा. यशवंत गोसावी यांचे ऐतिहासिक व्याख्यान (१.३०)
- शाहीर विक्रांत राजपूत यांचे लोककला सादरीकरण (३.३०)
- रामचंद्र पाटील यांचे ‘युगपुरुष शिवराय’ विषयावरील मार्गदर्शन (४.३०)
- डॉ. नम्रता भोसले-मोहिते यांचे ‘मराठकालीन स्त्री सामर्थ्य’ विषयावर व्याख्यान (५.३०)
🎭 सायंकाळी सांस्कृतिक जल्लोष
रात्री ७ ते १० या वेळेत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. दिग्दर्शक उदय साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ कलाकारांच्या सहभागातून शिवरायांच्या जीवनातील प्रसंग, युद्धे, गोंधळ, जोगवा आणि कोळीगीतांचा देखणा आविष्कार सादर केला जाईल.
🎆 कार्यक्रमाची सांगता रात्री १० वाजता बावण बुरुजावरून नयनरम्य आतिषबाजीने होणार आहे.
🏺 विशेष आकर्षण
- प्राचीन शस्त्रे व नाणी प्रदर्शन
- पुस्तक प्रदर्शन
- महिला बचत गटांचे स्टॉल्स
- शिवरायांच्या महाराणींच्या वंशजांची विशेष उपस्थिती
🙏 नागरिकांना आवाहन
आमदार श्वेताताई महाले पाटील व महोत्सव समितीने बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.








