बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे २०२६ रोजी शासकीय सुटी असल्यामुळे मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात येणारे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे दर शुक्रवारी नियमितपणे नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण तसेच कान-नाक-घसा (ENT) संबंधित दिव्यांग तपासणी बोर्डाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा महाराष्ट्र दिनाच्या सुटीमुळे १ मे रोजी हे शिबीर होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित दिव्यांग नागरिकांनी १ मे रोजी तपासणीसाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, सुटीच्या दिवशी तपासणी सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.







