---Advertisement---

“पक्षबांधणीसह जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या” – बाळासाहेब शेडगे!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. 31 मे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेगाव शहर व शेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी सहसंपर्क प्रमुख योगेश खोडके तसेच संजूभाऊ पळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीच्या प्रारंभी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर बाळासाहेब शेडगे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यपद्धती, संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार तसेच पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत सक्रियपणे काम करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मनसे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमित देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व विनोद टिकार यांनी शेगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य नव्या जोमाने सुरू करून पक्षबांधणीचे काम प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही दिली.

शेगाव तालुक्यासोबतच संग्रामपूर, जळगाव जामोद आणि खामगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील याच दौऱ्यात यशस्वीरीत्या पार पडल्या. या बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, जनहिताचे प्रश्न आणि पक्ष विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी शेगाव तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकर, शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर, सोपान भागेवार, योगेश खांडेकर, वाहतूक सेना अध्यक्ष रामा इंगळे, गजानन फासे, सचिन नागे, स्वयं पांडव, धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकार, किरण शेगोकार आणि राजू तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment