---Advertisement---

मुंबईहून बेपत्ता झालेली नवविवाहिता शेगाव रेल्वे स्थानकावर सुरक्षित; ASI रंजन तेलंग यांची तत्पर कामगिरी!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा ) : मुंबईतील बदलापूर येथील अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेली एक नवविवाहिता बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध शेगाव रेल्वे स्थानकावर लागला. रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) रंजन तेलंग यांच्या तत्परतेमुळे महिलेला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जुलै 2026 रोजी संबंधित महिला पतीसोबत दादर येथे फिरण्यासाठी गेली होती. पती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेल्यानंतर महिला दादर रेल्वे स्थानकावरून अचानक बेपत्ता झाली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

7 जुलै रोजी महिलेच्या मोबाईलचे लोकेशन शेगाव परिसरात आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी रेल्वे हेल्पलाइन 139 वर संपर्क साधला. त्यानंतर RPF शेगावला माहिती देण्यात आली.

ASI रंजन तेलंग यांनी प्राप्त झालेल्या छायाचित्राच्या आधारे सकाळपासून शेगाव रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम सुरू केली. सुरुवातीला महिला आढळून आली नाही. मात्र संध्याकाळी रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूमजवळ ती दिसून आली. त्यानंतर तिला सुरक्षितपणे RPF ठाण्यात आणून तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.

महिलेचे कुटुंब मुंबईहून शेगाव येथे दाखल झाले. प्राथमिक विचारपूस केली असता महिलेने कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर ASI रंजन तेलंग यांनी दादर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि “ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत सुपूर्दगीनामा तयार करून महिलेला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

बेपत्ता झालेली महिला सुरक्षित परत मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून ASI रंजन तेलंग आणि RPF शेगावच्या कार्याचे मनापासून कौतुक करत आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment