---Advertisement---

नागझरीत गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या; शेगाव पोलिसांत मर्ग नोंद!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 4 मे 2026 -शेगाव तालुक्यातील नागझरी येथे एका 42 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मर्ग नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर रामकृष्ण सोळंके (वय अंदाजे 42 वर्ष) रा. नागझरी, ता. शेगाव यांनी दि. 3 मे 2026 रोजी रात्री 11:00 ते दि. 4 मे 2026 रोजी सकाळी 8:00 या दरम्यान आपल्या घराजवळ वाड्यात लोखंडी अँगलला बकऱ्या बांधण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेची माहिती त्यांच्या साडू रविंद्र सुधाकर हिंगणे (वय 48 वर्ष) रा. वक्रतुंड कॉलनी, शेगाव यांनी पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल सरोदे यांनी नोंद केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घटनेमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment