---Advertisement---

नीट यूजी फेरपरीक्षेची तारीख जाहीर; 21 जून रोजी होणार परीक्षा, 22 लाख विद्यार्थ्यांना दिलासा!!

---Advertisement---

शेगांव (आकाश बोरसे) : पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. National Testing Agency अर्थात NTA ने नीट यूजी फेरपरीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून ही परीक्षा आता रविवार, 21 जून 2026 रोजी घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

NTA कडून 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट यूजी परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या संशयावरून रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मंगळवारी, 12 मे 2026 रोजी परीक्षा रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, परीक्षेनंतर सोशल मीडियावर काही ‘गेस पेपर’चे फोटो व्हायरल झाले होते. या गेस पेपरमधील अनेक प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत आल्याचे समोर आल्यानंतर संशय अधिक गडद झाला. त्यानंतर NTA ने चौकशी सुरू केली आणि तपासात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास Central Bureau of Investigation (CBI) मार्फत केला जात आहे. या गैरव्यवहाराचे धागेदोरे महाराष्ट्रातही आढळून आले असून नाशिक, पुणे, अहिल्यानगर आणि लातूर येथे कारवाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतची अधिकृत माहिती आणि पुढील अपडेट्स NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर तपासाव्यात.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment