---Advertisement---

ऑपरेशन “नन्हे फरिश्ते” अंतर्गत हरवलेला १३ वर्षीय बालक पालकांच्या स्वाधीन!!

---Advertisement---

मूर्तिजापूर |(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ५ जून – रेल्वे सुरक्षा बल (RPF) मूर्तिजापूर यांनी ऑपरेशन “नन्हे फरिश्ते” अंतर्गत तत्परता दाखवत ट्रेनमध्ये हरवलेल्या १३ वर्षीय बालकाला सुरक्षितरित्या शोधून त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

प्राप्त माहितीनुसार, रेल मदत संदेशाद्वारे ट्रेन क्रमांक 12139 डाउनच्या जनरल डब्यात सौरभ अभय चौधरी हा अल्पवयीन मुलगा आपल्या पालकांपासून विभक्त झाल्याची माहिती मिळाली होती. मुलाचे पालक शेगाव रेल्वे स्थानकावर राहिले असताना मुलगा ट्रेनमध्ये चढला होता.

या माहितीच्या आधारे RPF मूर्तिजापूरचे HC गोपाल हरने, आरक्षक संदीप तायडे तसेच एस्कॉर्टिंग इंचार्ज ASI नितीन मिस्त्री यांनी तात्काळ कारवाई करत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर संबंधित डब्यात जाऊन मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले.

यानंतर मुलाला RPF थाना मूर्तिजापूर येथे आणण्यात आले. मुलाची त्याच्या पालकांशी मोबाईलवरून संपर्क साधून सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलाचे आई-वडील हेमलता अभय चौधरी व अभय सुधाकर चौधरी हे सकाळी ९ वाजता RPF थाना येथे दाखल झाले.

ASI हरीश महल्ले यांनी निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच CWC अकोला यांच्या निर्देशानुसार आवश्यक ओळख पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून दोन पंचांच्या उपस्थितीत सौरभ चौधरी याला सुरक्षित अवस्थेत त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

या कार्यवाहीमुळे RPF च्या सतर्कतेचे आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment