---Advertisement---

पैठणीचा महोत्सव 2026: शेगावात महिलांसाठी रंगणार भव्य कार्यक्रम!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): झी मराठी प्रस्तुत ‘पैठणीचा महोत्सव’ हा विशेष कार्यक्रम येत्या शनिवारी, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. देशमुख फार्म, रौकडिया नगर, खामगाव रोड, शेगाव येथे हा सोहळा रंगणार असून परिसरातील सर्व माता-भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमात पारंपरिक पैठणी साड्यांचा देखणा सोहळा, विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलांच्या सहभागातून संस्कृतीची झलक दाखवणारा हा महोत्सव ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

कार्यक्रमाचे आयोजन श्री. अंकुश विजयाराव देशमुख (बांधकाम सभापती, न. प. शेगाव) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment