---Advertisement---

उद्या शेगावात प्रकाश राऊत नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : माननीय लोकप्रिय आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत हे उद्या मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी शेगाव येथे नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

विश्राम भवन (रेस्ट हाऊस), शेगाव येथे दुपारी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्रकाश राऊत नागरिकांना भेटणार असून नागरी प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, तहसील तसेच इतर विविध शासकीय कामांबाबत मार्गदर्शन व समस्या निवारण करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टी शेगाव शहर व शेगाव ग्रामीण यांच्या वतीने सर्व नागरिक, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या प्रभागातील व गावातील नागरिकांना याबाबत माहिती द्यावी तसेच ज्यांची कामे प्रलंबित आहेत त्यांनी विश्राम भवन येथे उपस्थित राहून आपली समस्या मांडावी.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment