बुलढाणा (आकाश बोरसे) : दि.३१ मे -बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाशजी पाटील अवचार यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या मुख्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याच कार्यक्रमात रामविजय बुरुंगळे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) तसेच अॅड. भालेराव साहेब (अध्यक्ष, जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटी) यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमोद पाटील, इरफान पठाण, जुबेर पटेल, अझहर देशमुख, गजनफर खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेव)










