---Advertisement---

शेगाव तालुका पत्रकार म्हणून प्रशांत पवार यांची नियुक्ती!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. १ जून- युवा क्रांती डिजिटल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने प्रशांत रमेश पवार यांची शेगाव तालुका पत्रकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक संदीप काळे यांच्या हस्ते प्रशांत पवार यांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेवक रमेश (सोनू) मोहड, युवा क्रांती डिजिटल मीडिया प्रा. लि.चे मुख्य संपादक विजय डिगांबर यादव, शंकर बुरूंगे, शितल निकम, पूजा राहाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर बोलताना माजी नगरसेवक संदीप काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “तरुणांनी पत्रकारितेकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता एक सामाजिक आव्हान आणि जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणे, सत्य जनतेसमोर आणणे आणि लोकहिताचे कार्य करणे हे पत्रकारितेचे खरे उद्दिष्ट आहे.” त्यांनी युवा क्रांती डिजिटल मीडिया आणि मुख्य संपादक विजय डिगांबर यादव यांचे अभिनंदन करत तरुणांना संधी देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.

युवा क्रांती डिजिटल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून प्रशांत पवार हे शेगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व प्रशासकीय घडामोडींचे वस्तुनिष्ठ आणि जबाबदार वृत्तांकन करणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक प्रश्न आणि जनतेच्या समस्या अधिक प्रभावीपणे पुढे येतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी प्रशांत पवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment